
SOLAPUR’S FORMER MLA निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन
FORMER MLA NIRMALATAI THOKAL PASSED AWAY
माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन
सोलापूर 24 ||
(FORMER MLA PASSED AWAY) सोलापूर : (Senier Congress Party Leader) काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ (Nirmalatai Thokal) यांचे मंगळवार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले ॲड. विपीन, सचिन, दोन सुना डॉ. सुनिता व शिल्पा व नातवंडे असा परिवार आहे.
सन २००६ साली सोलापुरात झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (All India Marathi Literature Conferenc) त्या कार्याध्यक्ष होत्या. त्यांनी विधानसभा व विधान परिषदेतही काम पाहिले आहे. माजी विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या निर्मलाताई ठोकळ यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी झाला.
सन १९६२ ते १९६७ आणि १९६९ ते १९७४ अशा दोन टर्ममध्ये त्यांनी नगरसेवकपद भूषविले आहे. १९७२ ते १९७८ या कालावधीत त्यांची विधानसभेवर निवड झाली होती. १९८२ ते १९८८ या कालावधीत त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य होत्या. विधान परिषदेच्या आश्वासन समितीचे प्रमुख म्हणून, पंचायत राज व अन्य समित्यांवर देखील त्यांनी काम पाहिले आहे. सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संस्थापक संचालक म्हणून त्यांनी १९७५ ते १९८४ या कालावधीत काम पाहिले. १९६८ पासून ते दीर्घकाळ इंदिरा महिला जीवन विकास सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या त्या चेअरमन होत्या. महिला प्रबोधिनी या मासिकाच्या संस्थापक संपादक म्हणून त्या कार्यरत होत्या. १९९२ ते १९९८ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील त्या संचालकही राहिल्या आहेत. २००४ ते २००६ या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या त्या उपाध्यक्ष होत्या.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, दिवंगत माजी खासदार तुळशीदासदादा जाधव यांच्या त्या कन्या होत. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या पत्नी स्व. कलावतीताई या त्यांच्या ज्येष्ठ भगिनी तर त्यांचे पुत्र उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले हे त्यांचे भाचे होत.
Post Comment