
मनिष रावत विजेतेपदाचे मानकरी
राज्य मानांकित प्रौढ एव्हरग्रीन कप स्पर्धा
सोलापूर 24||
सोलापूर : पुणे डेक्कन जिमखाना येथे झालेल्या राज्य मानांकित प्रौढ एव्हरग्रीन कप स्पर्धेत सोलापूरच्या मनिष रावत यांनी विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी ही कामगिरी 5० वर्षापुढील वयोगटात केलेली आहे.
रावत यांनी ठाण्याच्या तेजस नाईक यांचा 11-3 12-14 11-4 11-7 अशा फरकाने पराभूत करून अजिंक्यपद प्राप्त केले. त्यांनी सेमी फायनलमध्ये पुण्याच्या नचिकेत देशपांडे यांना हरवले. तेजस नाईक यांनी शरद ग्रोवर यांचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
४५ वर्षे वयोगटात ओंकार जोग हे विजयी झाले. त्यांनी पुण्याचा आदित्य गारडे यांचा 15-13,11-4,11-5 अशा फरकाने पराभूत केले. सेमी फायनलमध्ये त्यांनी शेखर काळे यांचा पराभव केला. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत दीपक कदम यांचा पराभव करीत सेमी फायनल गाठली होती.
६० वर्षे वयोगटात मारकड यांनी अजय कोथावले यांचा 14-12-11-7-11-7 अशा फरकाने मात केली. त्यांनी उपांत्यफेरीत आपलाच संघ सहकारी संजय मेहता यांचा तर कोथावले यांनी योगेश मोटवानी यांचा पराभव केला.
६५ किलो वर्षे वयोगटात केळकर यांनी उमेश कुंभोजकर यांचा अंतिम फेरीत 7-11-11-4,11-9,11-4 अशा फरकाने मात केली. केळकर यांनी उपांत्य फेरीत जयंत कुलकर्णी यांचा तर कुंभोजकर यांनी रवींद्र देवधर यांचा पराभव केला. सांघिक गटात क्लेवर ग्रुप डेक्कन स्मॅशर्स संघ विजेता ठरला. अंतिम सामन्यात या संघाने टोर्नोडोज संघाचा 3-2 ने पराभव केला.
पहिल्या एकेरीत डेक्कनच्या विवेक आलवाणी यांचा सतीश कुलकर्णी यांनी 11-7, 9-11, 8-11, 11-6, 6-11ने मात केली. दुसऱ्या एकेरीत डेक्कनच्या अजय कोथावले यांचा पिनाकीन संपत यांच्याकडून 5-11,11-5,11-8,14-16-7-11 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. दुहेरीत आलवाणी-विदूर पेंढारकर यांनी सतीश-पिनाकीन या जोडीचा 11-7,11-7-11-8 अशा फरकाने पराभूत केले.
या स्पर्धा सर्व्ह स्पोर्ट्स प्रो एलएलपी यांच्यावतीने डेक्कन जिमखाना क्लब ऑडिटोरियम येथे पार पडल्या. महाराष्ट्र स्टेट व्हेटेरियन टेबल टेनिस असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशन आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या विद्यमाने पार पडल्या.
मनिष रावत यांनी सलग दोन राज्य मनांकित स्पर्धेत अजिंक्य राहिल्याने त्यांचा सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, सचिव झेड.एम. पुणेकर व सर्व खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.
Post Comment