
गुरुवारी कुर्डूवाडीत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
बेरोजगारांना सुवर्णसंधी : दहा उद्योजक करणार 621 पदांची भरती
सोलापूर 24 ||
सोलापूर : सोलापूर जिल्हयातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी गुरुवार, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हणमंत श्रीरंग नलावडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर, मॉडेल करियर सेंटर, सोलापूर आणि डॉ. भारत पाटील फाउंडेशन, टेंभुर्णी, जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीय, मशिन ऑपरेटर, बी. कॉम, एम.कॉम, अशा प्रकारची एकूण 621 पेक्षा अधिक रिक्तपदे 10 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्यूमच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह गुरुवार, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत “श्री गणेश हॉल, वागळे हॉस्पिटलजवळ (माढा रोड, कुर्डूवाडी, ता. माढा जिल्हा सोलापूर) येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीस्तव https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट दयावी.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत (0217-2992956) या दूरध्वनी क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ( नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर) येथे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हणमंत श्रीरंग नलावडे यांनी केले आहे.
Post Comment