breaking

फटाके विक्रीसाठी TEMPORATY LICENSES देण्याची प्रक्रिया सुरु

TEMPORATY LICENSES FOR THE SALE OF FIREWORKS

फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने; दि. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करा

सोलापूर 24 ||

सोलापूर :  जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सन २०२५ सालच्या दीपावली सणानिमित्त शोभेच्या दारू (फटाके) विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्यात येणार आहेत. परवाने देण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इच्छुक विक्रेत्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (LE-५) सेतू कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर येथे प्राप्त करावेत. दि. १७ सप्टेंबर ते दि. ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) गृह शाखा, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दूध डेअरी शेजारी सोलापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

fatakhe-3-the-sol-1-300x169 फटाके विक्रीसाठी TEMPORATY LICENSES देण्याची प्रक्रिया सुरु

 अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे (Required documents to be attached with the application):

  1. अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  2. ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपरिषद यांच्याकडील ना-हरकत प्रमाणपत्र
  3. वयाचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला (LC) किंवा जन्म प्रमाणपत्र
  4. संबंधित जागेचा ७/१२ उतारा किंवा मिळकत उतारा, जागेचा नकाशा व स्थानिक प्राधिकरणाचे संमतीपत्र
  5. स्वघोषणापत्र self declaration

 महत्त्वाच्या अटी (Important Terms):

  • अर्ज सादर केल्यानंतर पोलीस विभागाकडून चौकशी अहवाल प्राप्त होणे आवश्यक आहे
  • दि. ३० सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
  • शासन व न्यायालयाकडून प्राप्त निर्देश, अटी व शर्ती अर्जदारांवर बंधनकारक राहतील
  • परवाना देण्याचा अंतिम निर्णय परवाना प्राधिकाऱ्यांचा असेल

 परवाना शुल्क (License Fee):

  • अर्जाच्या चौकशीअंती 600 रुपये चलनाद्वारे भरावे
  • यापूर्वी मिळवलेल्या परवान्याची प्रत जोडणे आवश्यक

 अधिक माहितीसाठी संपर्क (For more information contact):

  • गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दूध डेअरी शेजारी, सोलापूर.

Post Comment