मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाची विक्रमी कामगिरी
आयओसीएल पाकणी साईडिंगमधून 243 रॅक पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक; ₹34.71 कोटींची भरीव मालवाहतूक वाढ
सोलापूर 24 न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 2025 मध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. आयओसीएल पाकणी साईडिंगमधून 243 रॅक पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करून ₹34.71 कोटींची भरीव मालवाहतूक वाढ नोंदवली आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 2025 या वर्षात सोलापूर जिल्ह्यातील आयओसीएल पाकणी साईडिंगमध्ये पेट्रोलियम उत्पादनांच्या वाहतुकीत सातत्यपूर्ण आणि भरीव वाढ नोंदवून मालवाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
2025 मधील मालवाहतूक कामगिरी :
आयओसीएल पाकणी साईडिंगमध्ये पेट्रोलियम, तेल आणि वंगण (पीओएल) उत्पादनांच्या वाहतुकीची पहिलीवहिली कार्यवाही दि. 28 जानेवारी 2025 रोजी हाती घेण्यात आली, जी भारतीय रेल्वे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) साठी एक ऐतिहासिक घटना ठरली. कामकाजाच्या सुरुवातीपासून, या वर्षातील कामगिरी अत्यंत उत्तम राहिली आहे. – डिसेंबर 2025 पर्यंत 243 रॅक यशस्वीरित्या भरण्यात आले. – सोलापूर विभागासाठी ₹34.71 कोटींचा मालवाहतूक महसूल प्राप्त झाला.

-
प्रमुख गंतव्यस्थाने :
-
पाकणी येथून सेवा दिली जाणारी प्रमुख गंतव्यस्थाने खालीलप्रमाणे आहेत:
-
– मिरज (महाराष्ट्र)
-
– हिरेनंदुरू, कलबुर्गी जिल्हा (कर्नाटक)
-
– हुबळी (कर्नाटक)
-
– सिकंदराबाद (तेलंगणा)
-
हे अनेक राज्यांमध्ये व्यापक प्रादेशिक कनेक्टिव्हिटी दर्शवते.
- वाहतूक केलेली उत्पादने:
- पाकणी साइडिंगमधून विविध प्रकारच्या पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक केली जाते, जसे की
- – हाय स्पीड डिझेल (एचएसडी)
- – मोटर स्पिरिट (एमएस)
- – सुपीरियर केरोसीन ऑइल (एसकेओ)
- – इथेनॉल
- – बायोडीझेल
- उत्पादनांचे हे वैविध्यपूर्ण मिश्रण कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रेल्वे मार्गाद्वारे पारंपारिक आणि पर्यायी इंधनाच्या वाहतुकीला मदत करते.
- पाकणी साईडिंमध्ये झालेला अमुलाग्र बदल:
- आयओसीएल पाकणी साईडिंग हे एक सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून उदयास आले आहे. ही महाराष्ट्रातील पहिली आयओसीएल रॅक-लोडिंग सुविधा, भारतातील आयओसीएलचे नववे विशेष विपणन रॅक-लोडिंग ठिकाण आणि देशभरातील रिफायनरीसह एकूण 18 वे ठिकाण बनले आहे.
मूळतः 1996 मध्ये अधिसूचित केलेल्या आयओसीएल पाकणी साइडिंगमधून पूर्वी मर्यादित प्रमाणात पेट्रोलियम उत्पादनांची आवक-जावक होत असे. 2025 मध्ये बाह्य मालवाहतूक कार्यान्वित झाल्यामुळे, ही साईडिंग आता मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक हाताळत आहे. ज्यामुळे ती या प्रदेशासाठी एक प्रमुख मालवाहतूक केंद्र बनली आहे.
या महत्त्वाच्या मालवाहतूक उपक्रमाला कोयाली (वडोदरा) ते पाकणी (सोलापूर) पर्यंतच्या 747 किलोमीटर लांबीच्या समर्पित पाईपलाईनद्वारे पाठिंबा मिळत आहे. पेट्रोलियम उत्पादने कोयाली रिफायनरीतून पाकणी डेपोपर्यंत पाईपलाईनद्वारे अखंडपणे पोहोचवली जातात. त्यानंतर रेल्वे रेकद्वारे जवळच्या डेपो आणि उपभोग केंद्रांपर्यंत वितरित केली जातात, ज्यामुळे सुरक्षितता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होते.
आयओसीएल पाकणी साईडिंगवर पेट्रोलियम उत्पादनांच्या लोडिंगमधील प्रभावी कामगिरी ही भारतीय रेल्वे आणि आयओसीएल यांच्यातील प्रभावी समन्वयाचा पुरावा आहे. मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग मालवाहतूक क्षमता वाढवण्यासाठी, महसूल वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्र, शेजारील राज्ये व संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे.
Post Comment