breaking

सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा!

डॉ. आनंद चव्हाण, संतोष खेंडे, श्रीकांत शेटे, अजित संगवे, शरणबसवेश्वर वांगी मानकरी

सोलापूर 24||

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून यंदाच्या वर्षापासून क्रीडा, शारीरिक शिक्षण, खेळ व व्यायाम या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार देण्यात येणार असून, डॉ. आनंद चव्हाण, संतोष खेंडे, श्रीकांत शेटे, अजित संगवे, शरणबसवेश्वर वांगी हे पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांची घोषणा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी बुधवारी (दि. २७ ऑगस्ट रोजी) पत्रकार परिषदेत केली.

ahilya-purskar-24-300x169 सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा!

 

1.anand-chawhan-223x300 सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा!

  • उत्कृष्ट शारीरिक शिक्षण अध्यापक व संचालक पुरस्काराचे मानकरी संगमेश्वर कॉलेजमधील डॉ. आनंद बाळासाहेब चव्हाण हे ठरले आहेत.

2.santosh-khende-e1756293518549-257x300 सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा!

  • उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार संगमेश्वर जुनिअर कॉलेजचे संतोष धर्मा खेंडे यांना प्राप्त झाला आहे.

3.shrikant-shete-267x300 सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा!

  • उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार स्विमिंग अँड डायव्हिंगमधील श्रीकांत गंगाधर शेटे यांना प्रदान केला जाणार आहे.

5.sharan-wangi-e1756293583874-243x300 सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा!

  • हँडबॉलमधील शरणबसवेश्वर सिद्धाराम वांगी यांना मिळाला आहे.

4.ajit-sangave-e1756293558771-214x300 सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा!

  • अहिल्यादेवी उत्कृष्ट क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार बापूराव संगवे यांना जाहीर झाला आहे.

 

मानपत्र, सन्मानचिन्ह, अहिल्यादेवींची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून समितीने पुरस्कर्त्यांची निवड केली आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी ४ वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्या खेळाडूंनी ऑल इंडिया, साऊथ वेस्ट झोन आणि क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा खेळाडूंचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचादेखील यावेळी सन्मान केला जाणार आहे.

राष्ट्रीय क्रीडादिनी शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमास खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अतुल लकडे यांनी केले आहे.

Post Comment