breaking

एस.टी. महामंडळात शिकाऊ उमेदवारांसाठी 320 जागांची भरती

दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सोलापूर 24||

सोलापूर :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागात सन 2025-2026 सालाकरिता आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांसाठी  320 जागांची भरती करण्यात येणार आहे. अशा प्रकारची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.                पात्र उमेदवारांनी सदर 320 जागांसाठी  apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. 31 ऑगस्ट 2025 असा आहे.  कागदपत्र तपासणीचा दिनांक 1 सप्टेंबर 2025 असा आहे.

S.T-the-sol-24-1024x576 एस.टी. महामंडळात शिकाऊ उमेदवारांसाठी 320 जागांची भरती

याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय, जी.एम.चौक, बुधवार पेठ, सोलापूर ( 4133002) येथे संपर्क साधावा, असे  आवाहन विभाग नियंत्रक अमोल चं. गोंजारी, यांनी केले आहे.

Post Comment