breaking

दहिटणे, शेळगीतील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप

सोलापूर 24 ||

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे, शेळगीतील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

दहिटणे येथील राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत १ हजार १२८ आणि शेळगीतील  श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत २२०  अशा एकूण १ हजार ३४८ सदनिकांच्या वितरण करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव-पाटील, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. रणजितसिंह मोहिते- पाटील, आ. समाधान आवताडे, आ. दिलीप सोपल, अभिजित पाटील, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.

Post Comment